चाकोरीबाहेरचे
जगासाठी माझं जगणं मूर्खपणाचं वाटतयं
पर्वा नाही मला जगाची मला चाकोरीबाहेरचे जीवन जगायचयं
स्वच्छंद मनमुराद आनंदी जीवन जगायचयं
त्यासाठीच मला जीवन चाकोरीबाहेरचे जगायचयं
कस पणाला लावून प्रवाहाविरुद्ध पोहायचयं
माझं मला जीवन चाकोरीबाहेरचे जगायचयं
मळलेल्या वाटा सोडून नव्या वाटांवरुन चालायचयं
नवीन काहीतरी शोधण्यासाठीच तर मला चाकोरीबाहेरचे जीवन जगायचयं
✍️ © हिंदुराव गोळे
या आणि अशाच कविता पोवाडे आणि लेखांसाठी आपल्या ब्लॉगला खालील लिंकवर अवश्य भेट द्या.
https://hinduraogole.blogspot.com/

0 Comments