Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

कलीयुगीचा दधीची

कलियुगीचा दधीची

तुटली जीभ आणि डोळे फुटले
तरीही संभाजी मागे न हटले

दधीची सम समर्पित केले जीवन
पावन झाला रक्ताचा कण न् कण

सिंहाचा छावा असा काही नडला
औरंग्याही हतबल होऊन तडफडला

शौर्याची अन् बलिदानाची ही अमरगाथा
चरणांवर तुमच्या नतमस्तक माथा

बलिदानाने तुमच्या स्वराज्य रक्षिले रक्षिला धर्म
अतुल अफाट सांगून गेलात जीवनाचे मर्म

मृत्यूंजय संभाजी अमर हो झाले
भगव्या ध्वजाच्या रुपात त्यांना पाहिले

✍🏻 हिंदुराव गोळे

   अशाच काही कविता, पोवाडे व लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉगला  खालील लिंकवर अवश्य भेट द्या.

https://hinduraogole.blogspot.com/

🙏🏻🚩🍁🙏🏻🚩🍁🙏🏻🚩🍁

Post a Comment

0 Comments