शिवसूर्यमार्ग
संभाजींचे बलिदान कधी न विसरु
शिवसूर्यमार्ग आम्ही अति निष्ठेने धरु
संभाजी लढले आयुष्यभर धर्मासाठी
आम्ही ही लढू त्याच लढ्यासाठी
शिवसूर्यआण आम्हांस फिरु न कधी मागुती
आशिष देतील आम्हा भगवंत शिवछत्रपती
सिंहासमान जगू आम्ही स्वाभिमानी
शमणार आमुच्या समशेरी रिपू रक्त प्राशूनी
संभाजी भगव्या ध्वजास्तव लढले
रक्षूण धर्म आपुला ध्वजरुप झाले
✍🏻 हिंदुराव गोळे
अशाच काही कविता, पोवाडे व लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉगला खालील लिंकवर अवश्य भेट द्या.
https://hinduraogole.blogspot.com/

0 Comments