Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

वारसा शिवरायांचा

वारसा शिवरायांचा

शिवरायांच्या रक्ताचा अन् जिजाऊंच्या संस्काराचा
वारसा जपलेला शंभूछत्रपती आमुचा

लेखणीबरोबरच तलवारही तळपली ज्यांची
तिन्ही लोकी अजरामर किर्ती उरली त्यांची

स्वराज्यवेदीवरच्या यज्ञात दिली आहूती प्राणांची
पूजा करतो त्या धीरोदात्त बलिदानाची

ज्वलज्वलनतेजस चरित्राची शौर्य कहाणी
लिहितानाही थरथरते लेखणी

बलिदानाच्या तुमच्या धवलांकित किर्ती
मृत्यूंजय संभाजी अशी जगी उरली ख्याती

वढू तुळापूर भीमा इंद्रायणी संगमी
पावन झाली शंभूच्या रक्ताने पवित्र ती भूमी

तव तेजाच्या अंशाची आम्हा अभिलाषा
काळावरही घाव घालू असा आहे भरवसा

प्रसन्न होई तुळजाभवानी आशिर्वाद देऊनी
चंद्र सूर्यही गातील अमरशंभूची अमरकहाणी

धर्म रक्षिला तुम्ही हो बलिदान देऊनी
बळ देईल ते आम्हा लढण्या संकटा अस्मानी वा सुलतानी

नश्वर देहाचा मोह सोडूनी अमर तुम्ही हो झाला
एकच एक धर्मवीर शंभूराजा या जगी अवतरला

✍🏻 हिंदुराव गोळे

    अशाच काही कविता, पोवाडे तसेच लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर आपल्या ब्लॉगला भेट द्या.🙏🏻

https://hinduraogole.blogspot.com/

🙏🏻🌸🌺🌼🍁🌼🌺🌸🙏🏻

Post a Comment

0 Comments