शीलवान राजा
राजासमोर उभी केली तीला बंदी म्हणून
कल्याणच्या सुभेदाराची होती ती सून
सौंदर्याची अन् रुपाची होती जणू ती खाण
त्या सूनेला आई म्हणाला राजा तो शीलवान
आईचा दर्जा देऊन शत्रूच्या स्त्रीचा केला बहुमान
हीच होती आमच्या शिवरायांची शिकवण
सावित्रीबाई देसाईला मावळ्यांनी आणलं कैद करून
भीतीने तीचे सारे अंग गेले थरथरुन
तीच्या बाळाला दूध पाजले पेला ओठी लावून
मुजरा राजाला केला तीनं सद्गतीत होउन
साडी चोळी वतनाचा आहेर केला मानानं
बहीणीची त्या भाऊबीज केली एका भावानं
त्या ताईनं प्रसंग ठेवला शिल्पात कोरुन
सहा शिल्पांत मांडूनी केला राजाचा बहुमान
महाराष्ट्र असे गुणी रत्नांची खाण
आजन्म गाऊ शिवप्रभूंचे गुणगान
✍🏻 धारकरी-वारकरी
हिंदुराव गोळे
https://hinduraogole.blogspot.com/
👆🏻 आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

0 Comments