Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

श्रीराम

श्रीराम

मनामनात राम आमुच्या
 मुखात राम नाम

 रामनामाचा जप करतो 
करताना शुभ काम 

राम आमचा आदर्श आमची अस्मिता अन् जीवनाचं तंत्र

 जगण्या मरण्याचा आमुचा हा तारक मंत्र 

राम विजयी करेल आम्हा सर्वत्र
रामा सारखा ना बंधू कोणी ना पुत्र
       
राम एकमेव हा जगती सर्वत्र
पावन तयाचा देश तो पवित्र ते गोत्र

प्रत्येकातील ओळखू राम 
तसाच स्वतःतील आत्माराम

कशास यात्रा कराव्या मग चारही धाम
मुक्त करेल संकटातून  दयाघन घनश्याम

 रामराज्याच्या आनंदाची गुढी उभारू पावित्र्याची

 पहाट झाली मांगल्याची पावन पवित्र भगव्या ध्वजाची

✍🏻 हिंदुराव गोळे

https://hinduraogole.blogspot.com/

👆🏻आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

🙏🏻 🚩 🙏 🚩

Post a Comment

0 Comments