Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

प्रेम कोणाचं कसं

प्रेम कोणाचं कसं

प्रेम कोणावरही करावं 
भावानं भावावर
बहिणीने भावांवर
मुलांनी आईवर
पतीनं पत्नीवर

पण प्रत्येकाच्या प्रेमात
एक स्वार्थ आहे
आपल्यासाठी धावून येण्याची
एक आस आहे

निर्भेळ निस्वार्थी कोणच 
नाही करत इथं प्रेम खास
एकमेकांच्यात देण्या घेण्याचाच
व्यवहार इथं होत आहे हमखास

पण देवाचं मात्र भक्तावर जसं प्रेम
असतं
त्या प्रेमापुढे सर्वांचे प्रेम नेहमीच खुजं ठरतं

प्रल्हादाला देवाने संकटातून तारला
सुदाम्याच्या प्रेमापुढे  देवही रडला 
अर्जुनासाठी देव सारथी झाला
उष्ट्या पत्रावळ्या उचलून दासही झाला

ज्ञानेशाची भिंत स्वतः देवाने ओढली
सावता माळ्याची भाजी खुरपली
एकोबांच्या घरी कावड वाहिली
तुकोबांची गाथा पाण्यावर तारली

देवाच्या आणि भक्ताच्या नाही उपमा प्रेमाला 
देव भक्ताच्या प्रेमाला सतत भुकेला


✍🏻 हिंदुराव गोळे

https://hinduraogole.blogspot.com/

👆🏻 आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

🌹🌸🌺🍁🌹🌸🌺🍁

Post a Comment

0 Comments