Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

लेक

लेक

पोटी एक तरी लेक  असावी
काळजाच्या तुकड्यापरी तिला जपावी

लेक असते बापासाठी जणू दुसरी माय
दिसली नाही घरात ती तर त्याला करमतच नाय

तीच्या कोडकौतुकासाठी त्याची सारी धडपड
ऐकून घेतो कधीतरी तीची उगाचची बडबड

जपतो तीला तळहाताच्या फोडाहूनही काळजीनं
लेकही बापासाठी सोसते सारं आनंदानं

कमी जास्तीसाठी नसतो तीचा हट्ट
बापलेकीच्या नात्याची वीणच असते घट्ट

उंबरा ओलांडून निघताना लेक सासरी
बापाच्या डोळ्यातील अश्रू थांबतच नाहीत काही केलं तरी

आठवतात ठसे त्याला तीच्या मृदू पावलांचे
आठवण होते मायेने मिठी मारलेल्या तीच्या इवल्याशा बाहूंचे 

आईपेक्षाही बाप तीला अधिक जवळचा वाटतो
 दगडाच्या काळजाचा बाप लेकीसाठी हंबरडा फोडतो

आनंदात सुखात संसार कर सांगतो
आशिर्वादासाठी डोईवर ठेवलेला हात त्याचा थरथरतो

काळजाच्या तुकड्याला दूर जाताना पाहून
एकटाच बाप मान खाली घालून रडतो हमसून हमसून

जीवातला जीव करून परक्याच्या हवाली
बाप होतो लेकीसाठी मायेची सावली

✍🏻 हिंदुराव गोळे

https://hinduraogole.blogspot.com/

👆🏻 आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻

🙏🏻🌼🍁🙏🏻🌼🍁🙏🏻🌼🍁

Post a Comment

0 Comments