देवा धाव
देवा थांबव रे आता हे तांडव मृत्यूचे
किती दिवस आणि कसं हे आता सहन करायचे
नको होऊ रे इतकाही तू निष्ठूर
कसं रे तुझं मन झालयं कठोर
पाहवत नाही रे आता हे सारं
लवकर आता आम्हाला सावर
श्रद्धांजली वाहण्यास शब्दही कमी पडू लागले
अश्रू वाहून आता डोळेही कोरडे पडले
जगणंच होऊन गेलयं अवघड आता
उद्याचा दिवस पाहीन का नाही हीच चिंता
विनाशकारी कोरोना आता संपवून टाक
काळजापासून धावा करतोय मारतोय तुला हाक
किती घेशील देवा अजून परीक्षा
झाली तेवढी आता पुरी झाली शिक्षा
संकटातून सोडवण्या आम्हा देवा धाव घे आता
तुझ्याशिवाय या पामरांचा आहे कोण त्राता
© ✍🏻 हिंदुराव गोळे

0 Comments