Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

मृत्यूचा सोहळा

मृत्यूचा सोहळा

तिरंगा अंगावर घेऊन तू घरी आला
तिरंग्यालाही त्या स्वतः चा अभिमान वाटला

मृत्यूलाही आव्हान देऊन प्राणांती लढला
शर्थीची झुंज देऊनी तू धारातीर्थी पडला

देशसेवेचा घेतला तू अभिमानाने वसा
अर्ध्यावर डाव सोडून असा गेलास कसा

एका बाजूला तुझ्या विरहाचं दुःख फार
दुसऱ्या बाजूला तुझ्या हौतात्म्यात जीवनाचं सार

बघ तुझ्या मुलांनी फोडलाय टाहो
अदृश्य रुपाने त्यांच्यासोबत सदैव तू राहो

तुझ्या जाण्यानं पत्नी तुझी झालीय गलितगात्र
तूच होतास रे तीच्या आनंदाचा ठेवा एकमात्र

तुझ्या आईच्या  जीवाची झालीय परवड
तूच होणार होतास तीचा आधारवड

वडीलांनी जेव्हा तुला पाहिले
धाय मोकलून ते रडले

भाऊ बहीणी नातेवाईक झालेत गोळा
तूझ्या मृत्यूचाच बघ झालाय सोहळा

देशासाठी बलिदान तू करुनी 
अमर केलं तुला हौतात्म्यानी

चंद्र सूर्य असेल जोवरी
कीर्ती राहिल तुझी दिगंतरी

भारमातेच्या या शूर सुपूत्राला
वंदन करतो तव शौर्याला

     वीर हुतात्मा जवान सोमनाथ अरविंद तांगडे यांना सादर समर्पित.

© ✍🏻 हिंदुराव गोळे



🙏🏻🇮🇳🚩🙏🏻🇮🇳🚩🙏🏻🇮🇳🚩

Post a Comment

0 Comments