Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

दूर कुठेतरी

दूर कुठेतरी

दूर कुठेतरी वाटतं अनोळखी प्रदेशात जावं
जिथं आपलं नाव गाव कुणीही ना पुसावं

जिथे नसतील कसलेही आपआपसातील हेवेदावे
तिथं माणसातील मी पण सारे गळून पडावे

सूर्य किरणांच्या तेजाने तेथील फुले न सुकावीत
अन् झाडांचीही पाने कधी ना पिकावीत

जिथं पाखरांनीही गावीत मंजूळ गाणी
नद्या वाहव्यात अमृतकुंभ घेऊनी

पडावा साऱ्या जगाचा विसर असा
उघडला जावा हळूवार मनाचा कवडसा

शब्दशिल्प घडविण्यात आत्ममग्न व्हावं
स्वतःलाच मी असं हरवून जावं

अशा दूरच्या अनोख्या प्रदेशात जावं
अद्भुत असं नवं काहीतरी अवगत व्हावं

शब्दांशी खेळ खेळता खेळता हरवून स्वतःला
दूर कुठेतरी जावं हरवलेल्या स्वतःला शोधायला

तिथे नसावे कोणी आपल्याला ओळखणारे
सोबत असावे फक्त पक्षी नद्या आणि चंद्र तारे

© ✍🏻 हिंदुराव गोळे

     यापूर्वीच्या कविता, पोवाडे आणि माझ्या साठवणीतील आठवणी वाचण्यासाठी खालील लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻

https://hinduraogole.blogspot.com/

🙏🏻🌞🌻🌹☘️🌞🌻🌹🙏🏻

Post a Comment

0 Comments