कोणीतरी...
कोणीतरी एक असं असतं
जे तुमच्यासाठी स्वप्नं पहातं
कोणीतरी एक असं असतं
जे तुमच्या सावलीतही धन्यता मानतं
कोणीतरी एक असं असतं
जे तुमच्या सहवासासाठी आतूर असतं
कोणीतरी एक असं असतं
तुमचं आनंदगाणं ते स्वतः गातं
कोणीतरी एक असं असतं
तुमच्या समाधानात ते आनंदी असतं
कोणीतरी एक असं असतं
तुमच्या भरवशावर जगत असतं
कोणीतरी एक असं असतं
तुमच्या सामर्थ्याचा गर्व बाळगतं
कोणीतरी एक असं असतं
तुमच्या सोबतीतच आनंद अनुभवतं
कोणीतरी एक असं असतं
तुमच्या चेहऱ्यावरच्या हास्यासाठीच धडपडतं
कोणीतरी एक असं असतं
ज्याला तुमचं नसणं असह्य असतं
कोणीतरी एक असं असतं
ज्याला तुमच्या भेटीत आकाशही ठेंगणं वाटतं
कोणीतरी एक असं असतं
जे केवळ तुमच्या सुखाचीच अपेक्षा करतं
कोणीतरी एक असं असतं
जे तुमच्या मदतीचं ऋण मानतं
कोणीतरी एक असं असतं
जे तुमच्या यशाचा आनंद साजरा करतं
कोणीतरी एक असं असतं
ज्याच्या हृदयांत केवळ तुमचचं वास्तव्य असतं
असं एक कोणीतरी प्रत्येकाच्या आयुष्यात असतं
जे केवळ तुमचं आणि तुमचचं असतं
© ✍🏻 हिंदुराव गोळे
यापूर्वीच्या कविता, पोवाडे आणि माझ्या साठवणीतील आठवणी वाचण्यासाठी खालील लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻
https://hinduraogole.blogspot.com/

0 Comments