Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

भाऊ

भाऊ

भाऊच इथे झालाय वैरी भावाचा
विसरून गेलाय सगळा संबंध रक्ताचा

राम-लक्ष्मण कृष्ण-बलरामाचा
वारसा आहे आम्हाला थोर बंधुप्रेमाचा

ठेच लागली जर का एकाला
अश्रू येत दुसऱ्याच्या डोळ्याला

सुख दुःखात आधार एकमेकांना
समाधान वाटे आईवडिलांना

आता विसरलेत पवित्र नात्याला
दुरावलेत एकमेकांच्या बंधुप्रेमाला

शेवटी एक खरं रक्ताचं नातं तुटत नसतं
संकटात नेहमी हेच नातं धाऊन येतं

विसरून सारे आपसातील हेवेदावे
बंधुत्वाचे हे ऋणानुबंध प्रेमाने जपावे

© ✍🏻 हिंदुराव गोळे
    
    यापूर्वीच्या कविता, पोवाडे आणि लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻

https://hinduraogole.blogspot.com/

🙏🏻🌹🍁🙏🏻🌹🍁🙏🏻🌹🍁

Post a Comment

0 Comments