Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

तारुण्यं

तारुण्यं

तारुण्यं म्हणजे सळसळत्या रक्ताचं स्पंदन
निसर्गाने मानवाला दिलेलं अनोखं आंदण

काहीतरी करण्याची सततची जिद्द
संकटांशी लढण्याची एक निर्भिड उमेद

तारुण्यं म्हणजे मनमयुराचा मनमुराद नाच जसा
विश्वकर्त्याचा ऐटदार अबलक घोडा जसा

भविष्याचा राजमार्ग तयार करण्यासाठी
तारुण्यं असतं जीवनाचा स्वर्ग बनवण्यासाठी

ते असतं अथांग भावनांचा सागर
रसरशीत फुललेला जसा अंगार

तारुण्यं म्हणजे घोंघावणारं वादळ
स्फुरणाऱ्या बाहूंचे सळसळतं बळ

तारुण्यात स्वतः ला सावरायचं असतं
वाईट मार्गावर जाण्यापासून जपायचं असतं

तारुण्यंच ठरवत असतं उद्याची दिशा
जगायचं असतं ठरवण्या भविष्याची दशा

तारुण्यं म्हणजे तरुन जाणं
असतंआयुष्याचं अनोखं लेणं

© ✍🏻 हिंदुराव गोळे

     यापूर्वीच्या कविता, पोवाडे आणि साठवणीतील आठवणी वाचण्यासाठी खालील लिंकवर आपल्या ब्लॉगला भेट द्या.🙏🏻

https://hinduraogole.blogspot.com/

🙏🏻🌹🍁🌸🙏🏻🌹🍁🌸🙏🏻

Post a Comment

0 Comments