सोडून तर जायचयं
कधीतरी हे जग सोडून जायचंच आहे
माहीत नसतो तो दिवस कोणता आहे
मग कशाला कोणाशी विनाकारण भांडायचं
उगाचच हेवेदावे करत निष्कारण बसायचं
काय माहित कधी येईल तो जाण्याचा क्षण
म्हणूनच जपायचा आपल्या सोबतचा प्रत्येकजण
शक्यतोवर शांत राहून सारं पहायचं
कोणी कितीही रागावला तरी आपण शांत रहायचं
कोणीही काहीही सोबत घेऊन जात नसतो
मग का आपण उगाचच तुझंमाझं करत असतो
आपल्या सहवासाने सर्वांना आनंदी करायचं
दिलं घेतलं काहीही नसतं काढायचं
कुणाकडूनही कसलीच अपेक्षा न ठेवावी
दुसऱ्याने केलेल्या उपकारांची उतराई करावी
सोडून गेल्यावरही सर्वांच्या आठवणीत रहायचं
म्हणूनच तर त्यांच्या आठवणीत राहू असं जगायचं
© ✍🏻 हिंदुराव गोळे
खालील लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻
https://hinduraogole.blogspot.com/

0 Comments