Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

लाडक्या पत्नीस

तुझ्या पावलांनी गृह झंकारले
तुझ्या सहवासाने मन आनंदले

सौभाग्याचं लेणं भाळी तुझ्या शोभत आहे
तुझे पैंजणही माझ्या नावाने वाजत आहे

जन्मोजन्मीचं नातं आपलं अतूट बंधनाचं
प्रेमाने जपूया नातं हे आपल़ं स्नेहाचं

माझ्या प्रत्येक यशात तुझा वाटा अर्धा आहे
दुःखातही मला तुझी समर्थ साथ आहे

आपुलकीनं जपलसं माझ्या प्रत्येक नात्याला
आधाराचा भक्कम खांब तू माझ्या संसाराला

ठेवलास माझ्यावर तू सारा भरवसा
तुझ्या विश्वासाला तडा जाऊन देईन मी कसा

जन्मोजन्मी समर्थ साथ लाभू तुझी मला
कारण प्रत्येक जन्मी जपायचं आहे मला तुला

    वैवाहिक सहजीवनाच्या १५ व्या वर्षपूर्ती निमित्त सौ.मालास सस्नेह सादर.

© ✍🏻 हिंदुराव गोळेः

https://hinduraogole.blogspot.com/

🙏🏻🌹💐🌸🌹💐🌸🌹🍁

Post a Comment

0 Comments