अवकाळी पाऊस
विजांच्या कडकडाटात आणि ढगांचा गडकडाटात
अचानक पावसाला सुरुवात झाली जोरात
वारा जोराने सुटला अन पाऊस सुरु झाला
झाडाचा शेंडा हेलकावे घेऊ लागला
मुसळधार पावसाने उडवली दैना
थांबायचं काय तो नावच घेईना
ओढे नाले तुडुंब भरुन वाहू लागले
शेतातही पाण्याने तळे साचले
डोळ्यासमोर काहीही दिसेना
कसला काय पाऊसच थांबेना
साऱ्यांचीच झाली त्रेधातिरपीट
टपोऱ्या थेंबांनी झाली गारपीट
घरी जाण्याची लागलेय ओढ
पावसानं घेतलाय भलताच चढ
अवकाळी पाऊस भलताच रगेल
छत्री इरल्याला कसा तो मानेल
पाणीच पाणी झाले चोहीकडे
निसर्गाचा हा अनोखा साक्षात्कार घडे
© ✍🏻 हिंदुराव गोळे
यापूर्वीच्या कविता, पोवाडे आणि लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻
https://hinduraogole.blogspot.com/

0 Comments