Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

आईवडील

आईवडील

काठीसोबतच म्हातारपणी आपल्या माणसांचा आधार असायला हवा
लेकी सूना नातवंडाचा घरात सतत राबता असावा

म्हातारपण म्हणजे दुसरं असतं नवं बालपण
हसता खेळता जावा त्यांचा प्रत्येक क्षण न् क्षण

वृद्ध आईवडिलांना जीवापाड जपावं
त्यांनी केलेल्या उपकारातून थोडसं उतराई व्हावं

अनंत यातना कष्ट सोसले आजवर त्यांनी आपल्यासाठी
आता आपली पाळी व्हावं त्यांच्या आधाराची काठी

वृद्धाश्रमाची त्यांना कधीच चढावी लागू नये पायरी
विसरु नका आपलं अस्तित्व ही पुण्याई त्यांचीच सारी

तळहाताच्या फोडासारखं जपलं त्यांनी आजवर
वेदना होता आपल्याला जीव होई त्यांचा खालीवर

आजवर सांगा कुणी देव आहे का पाहिला
आईवडीलच साक्षात ईश्वर आहे आपला

तेच आपले देव आणि तेच आपले गुरु
त्यांच्यापासूनच खरे आपले अस्तित्व सुरु

उतारवयात काळजी घ्यावी आशिर्वाद मिळेल त्यांचा चांगला
देवाकडेही नोंद असते आईवडीलांशी तू कसा वागला

आईवडील म्हणजे साक्षात देवाचेच रुप
त्यांच्या सहवासातच खरा आनंद मिळतो खूप

सोडून गेल्यावर मग त्यांची खरी किंमत कळते
आठवणींनी त्यांच्या मग काळीज तीळ तीळ तुटते

© ✍🏻 हिंदुराव गोळे
   
      यापूर्वीच्या कविता, पोवाडे आणि काही आठवणीतील लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻

https://hinduraogole.blogspot.com/

🙏🏻🍁🌸🙏🏻🍁🌸🙏🏻🍁🌸

Post a Comment

0 Comments