Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

आई

आई

देव सर्वांसाठीच येऊ शकत नाही धरेवर
म्हणूनच त्याने आईला पाठवले माया करण्या लेकरांवर

आईच्या मायेला जगी तोड नाही
निरपेक्ष प्रेमाला तीच्या जोड नाही

लेकरांच्या सुखासाठी राबते रात्रंदिवस ती
किती आणि कसे कष्ट सोसते सर्वांसाठी ती

वेळप्रसंगी स्वतः ती उपाशी राहते
पण मात्र लेकरांना मायेचा घास भरवते

चंदनापरी कष्टविते तीची काया
डोळ्यात तीच्या अगणित माया

आईसारखी कोणी आहे का या जगती
शब्दांत सामावू शकत नाही तीची महती

तीच्या पदराखाली सुख सारे सामावते
मायेच्या ऊबीत तीच्या मन आनंदी होते

फक्त एका दिवसापूरती नका गाऊ तीची थोरवी
नित्याने तीच्या आदरार्थ गोड गाणी गावी

आत्मा आणि ईश्वराची आई प्रचिती
जगतात राहील तीच्या मायेची ख्याती

आईसारखे दुसरे दैवत जगी दुसरे नाही
आईला दुजी उपमा कशाचीही नाही

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी
पूजितो आईला मी माझा हृदयमंदिरी

© ✍🏻 हिंदुराव गोळे

   मातृदिनाच्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा.
सर्व मातांच्या चरणी सविनय सादर समर्पित.❤️💐💐

    यापूर्वीच्या कविता, पोवाडे आणि काही साठवणीतील आठवणी वाचण्यासाठी खालील लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻

https://hinduraogole.blogspot.com/

🙏🏻🌹🕉️🙏🏻🌹🕉️🙏🏻🌹🕉️

Post a Comment

0 Comments