Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

सकल संतांना विनवणी

सकल संतांना विनवणी

माऊली तुम्ही रेड्यामुखी वेद बोलविले  चालविलीत जड भिंत
पण अजूनही तुम्हाला समजू शकलो नाही हीच आहे खंत

नामदेवराय तुमच्या हाती नैवेद्य खातो प्रयक्ष पांडुरंग
पण आम्ही मात्र स्वतःचेच पोट भरण्यात दंग

नाथबाबा तुम्ही गंगेचं पाणी गाढवाला पाजले
पण आज मात्र पाण्यासाठी युद्ध माजले

तुकोबाराय तुमचा गाथा म्हणजे पंचम वेद
पण आम्हाला किती समजला हाच आहे खेद

सावता माळ्यांनी फुलविला भक्तीचा मळा
आम्हाला कसा लागत नाही त्या भक्तीचा लळा

गोरोबाकाका तुम्ही भक्तीत तल्लीन होऊन तुडविले बाळ
असं तल्लीन होण्याचा उरला नाही काळ

ज्ञानदिप्ती कळा संत  मुक्ताबाई
आमचे मन ना कधी ज्ञानाचा छंद घेई

जनाबाई तुमचा अधिकार किती मोठा
आम्हाला मात्र स्वतःचा अभिमान खोटा

चोखामेळा तुमची बहीण झाली विठाई
आमच्या भाग्यात कशी येईल ती पुण्याई

निळोबाराय तुमच्या भेटीसाठी तुकोबाराय आले
आमचे डोळे दर्शनासाठी कोरडे पडले

सकल संतांच्या चरणावरी ठेवितो डोई
तुमच्या भक्तीचा मार्ग आम्हाला दाखवा काही

वाट दाऊन गेलात तुम्ही सकलसंत आधी
आमच्या भाग्याचा उदय होणार तरी कधी

विनवितो तुम्हाला चरणावरी ठेवून माथा
सन्मार्ग दाखविण्यासाठी पुन्हा एकदा या आता

© ✍🏻  हिंदुराव गोळे
   
    यापूर्वीच्या कविता, पोवाडे आणि लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻

https://hinduraogole.blogspot.com/

🙏🏻🍁🌹🙏🏻🍁🌹🙏🏻🍁🌹

Post a Comment

0 Comments