Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

आईची आठवण

आईची आठवण

वासराला गाई जेव्हा पान्हा सोडते
तेव्हा मला माझी आई आठवते

चिमणी जेव्हा पिल्लाला चोचीने खाऊ घालते
तेव्हा मला माझी आई आठवते

एखादी आई लेकराला जेव्हा कुशीत घेते
तेव्हा मला माझी आई आठवते

मुलाच्या यशाने एखाद्या आईच्या डोळ्यात जेव्हा आनंदाश्रू तरळते
तेव्हा मला माझी आई आठवते

दूर कुठेतरी कुणी जात्यावरच्या ओव्या गाते
तेव्हा मला माझी आई आठवते

✍🏻 © हिंदुराव गोळे

   अशाच काही कविता, पोवाडे,लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

https://hinduraogole.blogspot.com/

🙏🏻🍁🌹🌼🌹🍁🌼🙏🏻

Post a Comment

1 Comments