मातृशक्ती
तू आदिशक्ती तूच भवानीमाता
तू राजमाता तूच भारतमाता
तू हो चंडमूंड भंडासूरखंडिणी
तूच रणचंडी कालीकर्पदिनी
तू हो वाघेश्वरी शारदा
तू अंबिका तूच सरस्वती वरदा
तू हो अनसूया तूच जनकनंदिनी
तशीच चंडिका हो समरांगणी
तू हो मुक्ताई तूच जनाई
तूच साऱ्या विश्वाची आई
तू हो राजमाता जिजाऊ
तशीच झाशीच्या राणीचा बाणा लढाऊ
तु देवकी तूच यशोदा
रामाची कौसल्यामाता सर्वदा
तू हो फुल्यांची मातासावित्री
आणि वाहू दे ज्ञानाची गंगोत्री
पवित्र तू पावन तू तूच पुण्यवंता
तुझ्याच कुशीतून जन्म मिळू दे आम्हा भाग्यवंता
✍🏻 हिंदुराव गोळे
https://hinduraogole.blogspot.com/
👆🏻 कृपया आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻

0 Comments