शिवराज्याभिषेक
रायगडी भगवा डौलाने फडकला
शिवछत्रपती मराठ्यांचा राजा की हो झाला
भक्ती शक्ती युक्तीच्या त्रिवेणी संगमाने
मराठ्यांचे सिंहासन स्थापन झाले अभिमानाने
हा क्षण आनंदाचा आणि उत्सवाचा
दसरा दिवाळी सण पुन्हा साजरा करण्याचा
एका डोळ्यात आनंद होता एका डोळ्यात आसू
गुलामगिरी पालथी घातली मनी होतं हसू
रक्ताचं पाणी अन् छातीचा करून कोट मावळे लढले
स्वराज्यासाठी प्राणपणाने ते तहयात झुंजले
एका हाती तलवार दुसऱ्या हाती मृत्यू होता
शिवराय आणि मावळ्यांचा नित्य हाच योग होता
स्त्रियांचा आदर आणि संतांचा होता सन्मान
यामुळेच वाढला माझ्या राजाचा बहुमान
सुखी होती प्रजा सारी होतं ते सुराज्य
जणू धरतीवर अवतरलं होतं पुन्हा रामराज्य
शत्रूंचाही थरकाप उडाला पाहूनी अवतार नरसिंह तो
श्री राजा शिवछत्रपती शिवाजी आमुचा सह्याद्रीचा सिंह जो
✍🏻 हिंदुराव गोळे
धारकरी - वारकरी
https://hinduraogole.blogspot.com/
👆🏻 कविता, पोवाडे,लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

0 Comments