भगवा
भगवा ध्वज आहे प्रतिक त्यागाचा
तसाच तो आहे समर्पणाचा
भगवा आहे प्रतिक पराकोटीच्या शौर्याचा
तसाच तो आहे बळकट बाहूंच्या धैर्याचा
भगवा प्रतिक आहे निस्वार्थी सेवेचा
तसाच तो आहे उच्चतम ध्येयाचा
भगवा ध्वज आहे श्रीरामांच्या राज्याचा
तसाच तो आहे श्रीशिवप्रभूंच्या हिंदवी स्वराज्याचा
भगवा निशाण आहे अर्जुनाच्या रथाचा
तसाच तो वंद्य आहे वारकरी धारकरी पंथाचा
भगवा ध्वज आहे प्रतिक धाडसाचा
तसाच तो आहे अचाट साहसाचा
भगवा ध्वज आहे ज्वलंत पराक्रमाचा
तसाच तो आहे इतिहास तेजाचा
भगवा आमचा प्राण भगवा आमची शाण
भगवाच आहे आमुचे निशाण
परमपवित्र भगवा ध्वज फडकत राहो दिगंतरी
आद्य गुरु तो आमुचा जन्मजन्मांतरी
त्रिवार वंदन आमुचे भगव्या ध्वजाला
प्राणाहूनी प्रिय आम्हाला एकचि भगवा ध्वज भला
✍🏻© हिंदुराव गोळे
https://hinduraogole.blogspot.com/
👆🏻 कृपया आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻

0 Comments