दुधावरची साय
दुधावरची साय जणू होती माझी माय
प्रेमाला तिच्या दुसरी कोणतीच उपमा नाय
राब राब राबली ती कष्ट केले अमाप
जेव्हापासून आली ती ओलांडून उंबऱ्यावरचं माप
साधीभोळीच होती शिकली नव्हती फार
पण सुखीजीवनाचं तीला कळलं होतं सार
मुलंबाळं नातीगोती जपत सांभाळला संसार
तीच होती आमच्या घराचा भक्कम आधार
मायेच्या पदराखाली तीच्या पळून जात दु:ख सारी
हळूच कुशीत जाता तिच्या मायेची ती पखरण करी
अंगाईत तीच्या होती भलतीच मजा न्यारी
ऐकता ऐकता कुशीतच तिच्या झोप लागतसे भारी
पोरकं करुन दूरच्या प्रवासाला निघून गेली माय
ओल्या डोळ्यांच्या कडा पुसणारा पदरच उरला नाय
थोर तुझे उपकार अन् थोर तुझे संस्कार
जगण्याचं बळ देतात रोज नित्य वारंवार
ओवाळून जीव जरी टाकला तुझ्या पायी
उतराई होईन कसा तिच्यातून थोर तुझी ती पुण्याई
आठवण येते तुझी पावलोपावली
विसरु कसं तुला माझ्या लाडाच्या माऊली
येशील का गं परतुनी पुन्हा लेकरासाठी
मारायचीय गं तुला एकदा ती मायेची मिठी
✍🏻 हिंदुराव गोळे
https://hinduraogole.blogspot.com/
👆🏻 आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या .🙏🏻

1 Comments
अप्रतिम
ReplyDelete